Ad will apear here
Next
वॉक फॉर खादी : ‘ला-क्लासे’ फॅशन शोने जिंकली मने
‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’तर्फे बावधन कॅम्पसमध्ये फॅशन शोचे आयोजन
टेक्नो मोड

पुणे :
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘ला क्लासे’ फॅशन शो नुकताच पार पडला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्राचा आणि खादीचा सन्मान वाढविण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर खादी : द नेशन्स प्राइड’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी बनवलेली आकर्षक आणि कलात्मक डिझाइन्स आणि मॉडेल्सनी केलेले त्याचे मनमोहक सादरीकरण यामुळे यंदाच्या ‘ला क्लासे’ फॅशन शोने उपस्थितांची मने जिंकली. फॅशन शोचे हे नववे वर्ष होते. 

सायकेंडेलिक खादी

फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण डिझाइन्स आणि त्यांच्या कलेचे सादरीकरण व्हावे, या उद्देशाने हा फॅशन शो आयोजित केला जातो. कर्करोगावर मात करून सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या डॉ. नमिता कोहोक यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोषाखांची डिझाइन्स कौतुकास्पद असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या फॅशन शोमधून देशाचा आणि खादीचा सन्मान झाला आहे, अशी भावना डॉ. कोहोक यांनी व्यक्त केली.

ड्रेप्ड ड्रामा

विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांतून आयोजित केला जाणारा हा फॅशन शो विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट डिझायनर शोधण्यासाठी उपयुक्त आहे. व्यावसायिक स्वरूपाच्या फॅशन शोप्रमाणे त्याचे आयोजन केले होते. फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कपड्यांच्या, दागिन्यांच्या डिझाइन्स परिधान करून अनेक प्रसिद्ध मॉडेल्सनी रॅम्प वॉक केला. यंदा विद्यार्थ्यांनी ‘वॉक फॉर खादी’ या संकल्पनेवर काम केले होते. त्यातून खादीचा प्रवास उलगडला. ड्रेप्ड ड्रामा, खादी मेट्रिक, सायकेंडेलिक खादी, ड्युअल वर्ल्ड, फ्रेमिंग लव्ह, टेक्नो मोड, खादीइझम या सात फेऱ्यांमध्ये हे सादरीकरण झाले. अनेक नामवंत कलाकारांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आणि हजारो विद्यार्थी, पालकांनी या शोला उपस्थिती लावली. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे राजेश पांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक किरण दगडे पाटील, शिवसेना शहर उपप्रमुख किरण साळी आदी मान्यवरांचाही त्यात समावेश होता.

खादी मेट्रिक

अलिशा राऊत, सोनल चौहान, अमानी सत्राला, प्रियाशा चौधरी आदी मॉडेल्सनी रॅम्पवॉक केला. मिसेस ग्लोबल युनाटेड विजेत्या डॉ. नमिता कोहोक यांनी परिधान केलेला विशेष पोशाख कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. प्रसिद्ध फॅशन डिझाइनर संदेश नवलाखा, निवेदक शिल्पा भेंडे, अनुजा शिंदे आणि सूर्यदत्ता संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. युवा कोरिओग्राफर विशाल सावंत याने दिग्दर्शन केले.

ड्युअल वर्ल्ड

‘फ्रेमिंग लव्ह’ला प्रथम क्रमांकाचे, तर ‘टेक्नो मोड’ला द्वितीय क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक मिळाले. सायकेंडेलिक खादी संकल्पनेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. स्नेहल जैन हिला बेस्ट डिझायनरचे बक्षीस मिळाले. खादीइजम मध्ये स्नेहा रांजणे, ऋतुजा डोंबाळे, कादंबरी शिंपी, उन्मेषा खांडके,  फ्रेमिंग लव्हमध्ये पूजा येमपल्ले, मानसी पडवळ, साक्षी अटकळीकर, सायली आगे, ‘ड्युअल वर्ल्ड’मध्ये याशी टिम्बडिया, योगिता भावेकर, रिया मोहन, ‘टेक्नोमोड’मध्ये तर्जनी पटेल, शीतल नेवे, शुभम ताकवले, ‘सायकेंडेलिक खादी’मध्ये नेहा सराफ, काजल परदेशी, स्नेहा पाटील, ‘ड्रेप्ड ड्रामा’मध्ये स्नेहल जैन, ‘खादी मॅट्रिक’मध्ये अंकिता दीक्षित, अंकिता दासरवार, पूनम मोढवे यांनी कॉश्च्युम डिझाइन केले होते.

खादीइझम

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरणपूरक आणि खादीपासून बनवलेल्या वस्तूंना यातून प्रोत्साहन मिळाले. खादीचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी ‘सूर्यदत्ता’चे विद्यार्थी प्रयत्न करतील. ‘



प्रा. घोसपूरकर म्हणाल्या, ‘तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी जे शिकतात, अनुभवतात, त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करून त्यांना प्रोत्साहित करावे, हा या फॅशन शोच्या आयोजनामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आभूषणांच्या, कपड्यांच्या डिझाइन्सचे दर्शन व्यावसायिक मॉडेल्स घडवितात. यातून डिझायनर्सना अनेक संधी उपलब्ध होतात.’ 

नूपुर पिट्टी यांनी फॅशन शोचे निवेदन केले.

डिझायनर्स रिया, याशी आणि योगिता - ड्युएल वर्ल्ड थीम

मॉडेल अमानी सत्राला



























 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZTTCJ
Similar Posts
‘सिम्बायोसिस’ने पटकावले ‘एन्थुजिया’चे विजेतेपद पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोन दिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद सिम्बायोसिस महाविद्यालयाने पटकावले.
‘राजसन्मान’ एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २३-२४ नोव्हेंबरला पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजसन्मान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, दि. २३ व रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी लोकायत सभागृह येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती
भारतीय संगीतातली मूलभूत अंगे वास्तुरचनेशीही निगडित : पं. सुरेश तळवलकर पुणे : ‘भारतीय कला तसेच संगीतातली शास्त्र, तंत्र, विद्या आणि कलाही अंग वास्तुरचनाशास्त्रामध्येही (आर्किटेक्चर) येतात. यात अमूर्ताकडून मूर्ताकडे होत जाणारा भारतीय बंदिशीतला प्रवास वास्तुरचनाशास्त्राशी जवळीक साधणारा आहे. त्यातील आकृतीबंध हा रागाचे मापदंड आणि आकारमानाशी संबंधित असून, संगीताची निर्मिती ही
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language